Maharashtra School Reopening: 2 ऑक्टोबर नंतर महाराष्ट्रातील महाविद्यालय पुन्हा सुरू करण्याचा निर्णय, उपमुख्यमंत्री अजित पवार

शुक्रवार, 1 ऑक्टोबर 2021 (08:47 IST)
कोविड -19 च्या प्रकरणांमध्ये घट लक्षात घेता, देशातील अनेक राज्यांमध्ये शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू होऊ लागली आहेत. या प्रकरणी मोठा निर्णय घेत महाराष्ट्र सरकारने 4 ऑक्टोबरपासून शाळा उघडण्याची घोषणा केली आहे. त्याचबरोबर येथील महाविद्यालय पुन्हा सुरू करण्याबाबत 2 ऑक्टोबरनंतर निर्णय घेतला जाऊ शकतो. कोविड साथीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यान त्याचा जास्तीत जास्त प्रभाव महाराष्ट्रात दिसून आला. 
 
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, "कोविड -19 च्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्रातील महाविद्यालये वेगवेगळ्या टप्प्यांत उघडली जातील. तसेच, महाविद्यालयात येणाऱ्या 18 वर्षांवरील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी लसीचे दोन्ही डोस.घेणे बंधनकारक असेल. " 
 
2 ऑक्टोबर रोजी आढावा घेतला जाईल 
अजित पवारांनी सांगितले की, राज्य सरकारने महाविद्यालयांमध्ये शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू केले आहे.18 वर्षांवरील प्रत्येक विद्यार्थ्याला लवकरच लसीचा डोस दिला जाईल. ते असेही म्हणाले, "आम्ही येथे 2 ऑक्टोबरला पुन्हा एकदा आढावा घेऊ.आम्हाला असं वाटते की आता महाविद्यालय उघडलें जाऊ शकतात तर आम्ही टप्प्याटप्पाने 2 ऑक्टोबर नंतर उघडू.
 
महाराष्ट्रात 4 ऑक्टोबरपासून शाळा सुरू होतील 
एक मोठा निर्णय घेत महाराष्ट्र शासनाने 4 ऑक्टोबर पासून येथे शाळा सुरू करण्यास हिरवा सिग्नल दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बैठकीनंतर सरकारने ही घोषणा केली. बालरोग टास्क फोर्स आणि आरोग्य विभागाने राज्यातील शाळा पुन्हा उघडण्याच्या निर्णयाला मान्यता दिली आहे. याची घोषणा करताना शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, शहरी भागातील शाळा आठवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी सुरु  होतील. ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी पर्यंत शाळा उघडल्या जातील.
 
तसेच, कोरोनाशी संबंधित परिस्थिती पाहता, जिल्हाधिकाऱ्यांना निर्णय बदलण्याचा अधिकार असेल. म्हणजेच, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाशी संबंधित परिस्थिती अनुकूल नाही, तेथे जिल्हा दंडाधिकारी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेऊ शकतात.मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती आवश्यक असेल. विद्यार्थ्यांवर हजेरीसाठी दबाव आणला जाणार नाही. आदेशात म्हटले आहे की शाळांना कोविड 19 प्रोटोकॉलचे कठोर पालन करावे लागेल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती