Free School Uniform शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यंदापासून सर्व सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्यात येणार आहे. यंदा शासकीय शाळांमध्ये मोफत दिला जाणारा गणवेश राज्यस्तरावर खरेदी करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांतील राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, बूट आणि साहित्य देण्यात येत मात्र यंदापासून खुल्या गटातील विद्यार्थ्यांनाही मोफत गणवेश देण्यात येणार आहे.
या नियमामुळे राज्यातील सर्व शासकीय शाळांचा गणवेश एकाच स्वरुपाचा करावा लागणार आहे. यासाठी अवघा दीड महिन्या वेळ आहे. सध्या गणवेश कसा असावा यावर विचार केला जात आहे. नंतर कापड खरेदीची निविदा तसेच गणवेश शिवून घेणे ते राज्यातील सर्व शाळांमध्ये पोहोचवणे अशी सर्व प्रक्रिया नवीन सेशन सुरु होण्यापूर्वी करावे लागणार आहे.
काही वर्षांपूर्वी राज्याच्या स्तरावर गणवेश खरेदीचा प्रयोग करण्यात आला होता. मात्र त्यावेळी गोंधळ झाला आणि नियम बदलावा लागला होता. दरवर्षी मे महिन्यात जिल्हास्तरावर शालेय गणवेशाचा निधी मिळत असतो मात्र अद्याप हा निधी शाळांपर्यंत पोहोचलेला नाही. अशात राज्य सरकारद्वारे गणवेश वाटप करणार असल्यचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.