शिवसेना फोडताना हिंदुत्व आठवलं नाही का?”संजय राऊत

गुरूवार, 4 मे 2023 (08:04 IST)
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत बेळगावमध्ये पोहोचले. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या उमेदवारांच्या प्रचारात ते सामील झाले. यादरम्यान त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
 
“महाराष्ट्राची अस्मिता आणि स्वाभीमानासाठी जसं आम्ही लढतोय, तसंच इथे एकीकरण समिती लढतेय. यावेळी मला एकीची वज्रमूठ दिसतेय. भाजप हिंदुत्वाचा प्रचार इथे करतोय. यांना ३०० रुपयांना हिंदुत्व मिळतं. यांचं हिंदुत्व खोक्यात आहे. शिवसेना फोडताना यांना हिंदुत्व दिसलं नाही? हिंदुत्ववादी, हिंदुहृदय सम्राट यांची शिवसेना, ज्या पद्धतीनं पैसे फेकून, सत्तेचा गैरवापर करून फोडली तेव्हा यांचं हिंदुत्व कुठे होतं? ज्या हिंदुत्वासाठी शिवसेनेनं बिलिदान दिलं, दंगलीत मुंबईसह महाराष्ट्र वाचवला, हिंदूंचं रक्षण केलं तेव्हा भाजपचे लोक घाबरून घराला कड्या लावून बसले होते. ती शिवसेना फोडताना हिंदुत्व आठवलं नाही का?” असा सवाल संजय राऊत यांनी केला.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती