Maharashtra Marathi Breaking News Live Today: वेगाने बदलणाऱ्या जगात आता एआयची भूमिका सर्वात महत्त्वाची असणार आहे. एआय प्रत्येक क्षेत्रात आपली ताकद दाखवण्यासाठी सज्ज आहे. अशा स्थितीत याबाबत माहिती व शिक्षण मिळणे गरजेचे झाले आहे. आता महाराष्ट्रात याची तयारी सुरू झाली आहे. देशातील पहिले AI विद्यापीठ महाराष्ट्रात बांधले जाणार आहे. त्याची ब्लू प्रिंट तयार करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे.