या प्रकरणात महाराष्ट्र बँकेचे डेप्युटी मॅनेजर राम प्रसाद येवले यांनी मारहाण केल्या प्रकरणात भाजपचे नेते नवनाथ शिराळेयांच्या विरोधात बीड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिराळे यांना प्रकरणाबद्दल विचारल्यावर मॅनेजर कोणत्याही ग्राहकाशी व्यवस्थित बोलत नाही तर इंग्रजीतून अर्ज लिहायला सांगतात. उलट आणि उद्धटपणे उत्तरे देतात. या मुळे त्यांच्यात बाचाबाची होऊन वाद झाले.
मॅनेजर काम करत असताना शिराळे यांनी बँकेत येऊन खात्याचा खाते उतारा मागितला या वर मॅनेजर ने त्यांना तुमचा ईमेल आयडी देण्यास सांगितले त्यावर शिराळे यांनी मराठीतून ईमेल आयडी दिले मॅनेजर म्हणाले की असे चालत नाही ईमेल आयडी इंग्रजीतून द्या. यावर दोघांमध्ये वाद झाले आणि शिराळे यांनी मॅनेजर शिराळे यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली. आणि त्यांच्या सोबत आलेल्यांनी लाथाबुक्क्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. हा सर्व प्रकार केमेऱ्यात कैद झाला आहे. या प्रकरणात नवनाथ शिराळे ,कृष्णा नवनाथ शिराळे यांच्यासह इतर दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.