मिळालेल्या माहितीनुसार कृषीमंत्री कोकाटे पुढे म्हणाले की, आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, त्यामुळे येथील प्रत्येकजण शेती आणि शेतकऱ्यांशी जोडलेला आहे. कृषी क्षेत्रात मनुष्यबळाची कमतरता आहे. तथापि, शेती निसर्गावर अवलंबून असल्याने, शेतकऱ्यांना हवामान बदलाचा फटका बसतो. अशा परिस्थितीत, पूरक व्यवसाय शेतकऱ्यांना मदत करू शकतात. तंत्रज्ञान कितीही प्रगती करत असले तरी शेतीमध्ये मनुष्यबळाला पर्याय नाही.