सध्या देशभरात मुस्लिम संघटनांकडून आय लव्ह मुहम्मद मोहीम आयोजित केली जात आहे. बीड येथे "आय लव्ह मुहम्मद" कार्यक्रमादरम्यान, एका मौलवीने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना दफन करण्याची धमकी दिली.हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
आय लव्ह मोहम्मद हा कार्यक्रम बीडमध्ये सुरु असताना एका मौलवीने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह आणि भडकाऊ भाषणे केली. मौलवीने थेट मंचावरूनच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना उघडपणे धमकी दिली. योगी जर माजलगावला आले तर त्यांना तिथेच दफन करू. तसेच मौलवीने योगी यांच्यासाठी अपशब्द वापरले.
मुख्यमंत्री योगी यांच्याविरुद्धच्या धमकीनंतर, या प्रकरणात पोलिस काय कारवाई करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. सोशल मीडियावर व्हिडिओ वेगाने पसरत असतानाही,बीड पोलिसांनी अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही, ज्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होतात.