Mahagenco Recrutiment Examination paper leak : सध्या राज्यात पेपरफुटीच्या बातम्या येत आहे. आता महानिर्मिती पदाच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटल्याची बातमी येत असून असा दावा स्पर्धा परीक्षा समन्वय समिती कडून घेण्यात आला आहे. या विषयावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता वर्तवली जात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे.
राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ असलेल्या ऊर्जा खात्यातील पेपर फुटले आहे. या पूर्वी देखील पोलीस भरतीचा पेपर फुटला होता. आता महाजेनको म्हणजेच महाराष्ट्र स्टेट पॉवर जनरेशन कंपनीच्या स्पर्धा परीक्षेचा पेपर फुटला आहे. फुटलेले पेपर त्यांच्याकडे असल्याचा दावा देखील स्पर्धा परीक्षा समन्वय समिती कडून करण्यात आला आहे.