IDBI Recruitment:भारतीय औद्योगिक विकास बँक (IDBI) ने कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापकाच्या(ज्युनियर असिस्टंट मॅनेजर) 600 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक उमेदवार या रिक्त पदांसाठी 15 सप्टेंबरपासून www.idbibank.in या अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची आणि फी भरण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2023 आहे.
अर्ज फी-
सामान्य/OBC/EWS श्रेणीतील उमेदवारांना रु. 1000 अर्ज शुल्क जमा करावे लागेल, तर SC/ST/PH उमेदवारांना रु. 200 भरावे लागतील. परीक्षा शुल्क डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंग, IMPS, कॅश कार्ड, मोबाइल वॉलेट, ई चलन याद्वारे भरावे लागेल.