तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांकडून कारवाई संदर्भात सोईस्कर दुर्लक्ष केल्यामुळे कायदेशीर दारू दुकानातून दारूचे खोकेच्या खोके दुकानाबहेर काढून विकण्याचे काम सुरूच असल्याबद्दलची तक्रार हेरंब कुलकर्णी यांच्याकडून होत आहे.यासंदर्भात हेरंब कुलकर्णी म्हणाले, सरकारच्या आदेशानुसार सध्या कोविड परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी संचारबंदीत दारूची दुकाने बंद ठेवली आहेत. स्मशानभूमीतही दारू विक्री सुरू केली.
अकोल्यातील स्मशानभूमी ते उदासी आश्रम या परिसरात शेतात दारूचे खोके ठेऊन खुलेआम विक्री सुरू आहे. अनेक मद्यपी तिथे गर्दी करत आहेत, अशी तक्रार परिसरातील नागरिक करत आहेत. तेथे गांजा विक्रीही सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी दारूच्या बाटल्या कोणत्या दुकानाच्या स्टॉकमधील आहेत याची तपासणी करून संबंधित करून परवाना रद्द करावा. यापैकीच दुकानातून अगस्ती चित्रपटगृह परिसरातही एका घरातून विक्री होत आहे.