लॉकडाउनच्या तिसर्या टप्प्यात राज्य सरकारनं मद्य विक्रीची दुकानं सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली होती. मात्र, पहिल्याच दिवशी नागरिकांनी मद्य विक्रीच्या दुकानांसमोर प्रचंड गर्दी केली आणि अनेक लोकांना यावर रोष व्यक्त केला. म्हणून आता यावर सरकारनं नवीन मार्ग काढला आहे. आता टोकन पद्धतीनं राज्यात मद्य विक्री केली जाणार आहे. यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागानं नियमावली जारी केली आहे.
रांगेत उभ्या असलेल्या ग्राहकांना त्यांची ऑर्डर देण्यासाठी एक फॉर्म द्यावा, ज्यामध्ये ग्राहकांचा नंबर, त्याचं नाव, मोबाईल नंबर आणि मद्याच्या मागणीचा माहिती असावी.
ग्राहकांना हा फॉर्म दिल्यानंतर टोकन क्रमांक देण्यात यावा.
टोकनऐवजी कोऱ्या कागदावर दुकानाचा शिक्का आणि मोबाईल नंबर देऊन टोकन क्रमांक लिहावा.
या पद्धतीनं एका तासात ५० ग्राहकांना सेवा देता येईल.
अशा प्रकारे ८ तासात ४०० लोकांना मद्य विक्री केली जाऊ शकते.