अर्जुनाच्या लक्षाप्रमाणे आमचे लक्ष पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे, शरद पवारांचे वक्तव्य

रविवार, 30 जून 2024 (17:01 IST)
लोकसभा निवडणुकी नंतर राज्य विधानसभा निवडणुकीची तयारी सर्व पक्षांनी सुरु केली आहे. शरद पवार यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसी युती करून विधानसभा निवडणूक लढवणार अशी घोषणा केली आहे. ज्या प्रमाणे अर्जुनाचे लक्ष फक्त माशाच्या डोळ्या कडे होते तसेच आमचे लक्ष पण आता फक्त विधानसभा निवडणूक कडे आहे. 

पिंपरी चिंचवड कॉर्पोरेट सभेला संबोधित करण्यासाठी राष्ट्रवादीचे (सप) अध्यक्ष शरद पवार शनिवारी पुण्यात पोहोचले होते.पुण्यात मोदी बागेत माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की पक्षात रोज नवीन लोक येत असून त्यांचे स्वागत आहे.आम्ही निवडणूक उद्धव ठाकरे शिवसेना आणि काँग्रेसोबत लढवणार असल्याचे त्यांनी सांगितले. जागावाटप बाबत लवकरच चर्चा करणार आहो. 

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 पैकी 30 जागा जिंकल्या आहेत, ज्यामध्ये काँग्रेसने सर्वाधिक13, शिवसेना (UBT) 9 आणि NCP (SP) 8 जागा जिंकल्या आहेत. दुसरीकडे महायुतीने 17 जागा जिंकल्या आहेत,तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.  
आता सर्व पक्षांचे लक्ष विधानसभा निवडणुकीकडे आहे. त्यासाठी त्यांची जय्यत तयारी सुरु आहे. 

भारतीय संघ टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनला आणि विराट कोहली आणि रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याबद्दल प्रतिक्रियादेत त्यांनी भारतीय संघाचे कौतुक केले आहे. त्यांनी विराट आणि रोहितच्या निवृत्ती घेण्याबाबत हा निर्णय योग्य आहे असे माझे मत आहे. मी त्यांचे अभिनंदन करतो असे ते म्हणाले. 
 
Edited by - Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती