गेल्याच महिन्यात मडगाव-कारवार आणि मडगाव-थिवी मार्गांवर विद्युतीकरणाची चाचणी झाली. मुंबईपासून रत्नागिरीपर्यंतचा सलग मार्ग विद्युतीकृत असल्यामुळे सध्या रत्नागिरीपर्यंत मालगाड्या तसेच दिवा- रत्नागिरी पॅसेंजर गाडी विद्युत इंजिनासह चालवली जात आहे. तसेच रेल्वे गाड्या विजेवर धावल्यामुळे डिझेलवर होणाऱ्या खर्चात मोठी बचत होणार आहे. तसेच धुरामुळे होणारे प्रदूषण आता होणार नाही.