टेम्पोच्या अपघातात 3 ठार, 1 जखमी

शनिवार, 19 मार्च 2022 (11:29 IST)
गंगापूर -वैजापूर रोडवर गंगापूर जवळ ट्रक आणि पिकअप टेम्पोच्या अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. गंगापूर वैजापूर मार्गावर रात्री 10  वाजेच्या सुमारास उसाने भरलेल्या ट्रक आणि पिकअप टेम्पोमध्ये जोरदार धडक झाली. अपघात इतका भीषण होता की टेम्पोच्या पुढच्या भागाचा अक्षरश: चुरडा झाला आहे. उसाचा ट्रक पलटी झाला आणि त्यातील सर्व ऊस रस्त्यावर पसरला. या अपघातात रोहित अरविंद सुरवसे, आकाश क्षीरसागर, गणेश पप्पू शिरसाठ, हे जागीच ठार झाले. तर शिवशंकर संघवी हा गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती मिळतातच गंभीर जखमींना रुग्णालयात दाखल केले असता तिघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. आणि शिवशंकर संघवी यांना औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. 
ट्रक चालक अपघातानंतर फरार झाला आहे. अपघातानंतर वाहतूक खोळंबली होती. नंतर पोलिसांनी वाहतूक सुरळीत केली. घटनेचा पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहे. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती