बस नदीत कोसळून 3 ठार, 28 जखमी

रविवार, 2 जानेवारी 2022 (12:46 IST)
खंडवा-बडोद मार्गावरील अलीराजपूरच्या चांदपूर गावाजवळ पहाटे एका प्रवासी बसचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. बस नदी कोसळून पडून तीन जणांचा मृत्यू झाला. 
मध्य प्रदेशातील अलीराजपूरमधील चांदपूर गावाजवळ लाखोदरा नदीत बस कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 28 प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
सांगितले जात आहे की, बसचे स्टीयरिंग निकामी झाल्यामुळे गुजरात कडून अलिराजपूर कडे येणारी बस चांदपूर गावाजवळ लाखोदरा नदीत कोसळली. बसला जेसीबीच्या मदतीने काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रवाशांची ओळख पटविण्याचे शोधकार्य सुरु आहे. 
या घटनेनंतर शोक व्यक्त करत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती