CBSC दहावी बारावी निकाल कधी येणार जाणून घ्या

मंगळवार, 11 एप्रिल 2023 (16:53 IST)
सीबीएससीच्या विद्यार्थ्यांचा इयत्ता 10 वी आणि इयत्ता12 वीच्या परीक्षा आता संपल्या आहे.आता मात्र निकाल कधी जाहीर होणार यावर लक्ष लागत आहे. गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही निकाल एकत्रित जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या वर्षी सेंट्रल बोर्ड ऑफ सेकेंडरी एजुकेशन ने 10 वी आणि 12 वी बोर्डाचे निकाल एकाच दिवशी काही तासांच्या अंतराने जाहीर केले होते. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात निकाल जाहीर होऊ शकतो. बोर्ड आता परीक्षा संपल्यावर उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरु करून निकाल तयार करेल. निकाल कधी आणि कोणत्या तारखेला जाहीर करण्यात येईल या संदर्भात माहिती सोशल मीडियावर जाहीर करण्यात येइल. निकाल सीबीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर results.cbse.nic.in वर प्रसिद्ध केले जातील . निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षा प्रवेश पत्र लागणार.    
Edited By - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती