राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांची पत्नी ऋता आव्हाड यांनी एका कार्यक्रमात खळबळजनक वक्तव्य दिले. त्यांनी मुलांना दहशतवादी ओसामा बिन लादेन यांचे चरित्र वाचण्यास सांगितले आणि ओसामा बिन लादेनची तुलना माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्याशी केली. त्या एका कार्यक्रमात शिक्षणाचे महत्त्व या विषयावर बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, ओसामा बिन लादेन हा जन्मजात दहशतवादी नसून त्याला समाजाने तसे बनवले. गुरुवारी एका कार्यक्रमात मुलांना त्यांनी ओसामा बिन लादेनचे चरित्र वाचायला सांगितले. त्या म्हणाल्या, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम जसे राष्ट्रपती झाले तसेच ओसामा बिन लादेन हे दहशतवादी झाले.त्यांना दहशतवादी होण्यास समाजाने भाग पाडले. निराशेतून ते दहशतवादी बनले. त्यांचे हे वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले असून विविध स्तरावरून तीव्र प्रतिक्रिया येत आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी इशरत जहाँ याचा बचाव केला तसेच इंडिया आघाडीतुन काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि सपाच्या नेत्यांनी याकूब, अफजल, सिमी, कसाब अशा दहशतवाद्यांचा बचाव केला आहे. इंडिया आघाडी व्होट मिळवण्यासाठी दहशतवाद्यांचे बचाव करण्याचा प्रयत्न करत आहे. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याशी ओसामाची तुलना करणे चुकीचे आहे. असे शेहजाद पुनावाला म्हणाले.