जगभरातील सर्वात मोठा माहितीचा स्त्रोत असलेल्या विकीपिडियाने आयोजित केलेल्या एका स्पर्धेमध्ये या फोटोने पहिला क्रमांक पटकावला आहे. #WikiL0-es Monuments ही थीम घेऊन जगभरातील व्यक्तींकडून त्यांच्या प्रदेशातील प्रेक्षणीय स्थळांचे फोटो मागवले होते. यामध्ये 45 हून अधिक देशांमधील नागरिकांनी त्यांच्या देशातील सर्वोत्तम प्रेक्षणीय स्थळांचे लाखो फोटो पाठवले. केवळ भारतातूनच सात हजारांहून अधिक फोटो या स्पर्धेसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी प्रशांत खारोटे यांनी सोमवती अमावस्येच्या दिवशी जेजुरीच्या गडावर टिपलेल्या खंडोबाच्या यात्रेच्या या फोटोला पहिले पारितोषिक मिळाले आहे.