नागपूरच्या RSS मुख्यालयावर आतंकी हल्ल्याची आशंका, जैश -ए-मोहम्मद च्या संघटनेकडून रेकी ,मुख्यालयाची सुरक्षा वाढवली

शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (19:57 IST)
पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद भारतात सातत्याने कट रचत असते. सध्या नागपुरातून मोठी बातमी येत आहे. दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने नागपुरातील अनेक भागात रेकी केल्याचं सांगण्यात येत आहे. नागपुरातील अनेक  ठिकाण मोहम्मदच्या रडारवर असून नागपुरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. याशिवाय रेशमबाग येथील हेडगेवार भवनाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून जैश-ए-मोहम्मदच्या काही दहशतवाद्यांनी नागपूरच्या काही भागात रेकी केल्याच्या बातम्या येत होत्या. याबाबत पोलीस सक्रिय झाले आहेत. आम्ही बेकायदेशीर क्रियाकलाप (प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे, त्याचा तपास गुन्हे शाखेकडून केला जात आहे. सुरक्षेबाबत ते म्हणाले की, नागपुरातील महत्त्वाच्या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. अनेक ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. यासोबतच लोकांना सावधगिरी पाळण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नागपुरातील अनेक भागात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
तसेच नागपुरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती