लस घ्या अन्यथा रेशन बंद होणार -छगन भुजबळ

शुक्रवार, 7 जानेवारी 2022 (17:32 IST)
सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याची मोहीम सुरु आहे. आता 15 ते 18 वयोगटाच्या मुलांचे लसीकरण सुरु झाले आहे. कोरोनामुळे कित्येक लोकांनी आपले जवळच्या लोकांना गमावले आहे.सध्या राज्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटची प्रकरणे देखील वाढत आहे. अद्याप काही लोकांनी लसी घेतल्या नाहीत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला पाहता राज्य सरकार कठोर पावले घेत आहे राज्यात दहावी बारावीचे वर्ग वगळून सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत या शाळा ऑनलाईन सुरु असणार . नाशिककरांना लस घ्या नाहीतर राशन बंद करण्यात येईल असा इशारा नाशिकच्या पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. हा नियम केवळ नाशिक साठी नव्हे तर गरज पडल्यास संपूर्ण राज्यासाठी लागू करण्यात येईल .सध्या कोरोनाच्या रुग्णाची संख्या वाढत असल्याने  राज्य सरकार सुरक्षेबाबत पावले  उचलत आहे. अद्याप जरी राज्य सरकारने कठोर निर्बंध लावले नाही तरी ही नागरिकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन केले नाही तर निर्बंध कठोर करण्यात येतील असा इशारा पालक मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. ते जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावाची बैठक घेताना बोलत होते. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती