येथील डंपींग यार्डात कचरा टाकण्यासाठी वन विभागाने मनाई केली. नगर परिषद प्रशासन जे.सी.पी. लावुन कचरा नीट लावत नाही. त्यामुळे कचरा कुठे टाकायचा? असा प्रश्न निर्माण झाला आहे. आम्ही नगरसेवक स्वखर्चाने घंटागाडी मध्ये डिझेल गाडीवर ड्रायव्हर कचरा घेणारा मजूर यांचा पगार आम्ही करीत आहोत घंटा गाडी खराब झाली तर स्वखर्चाने दुरुस्त करून आणावे लागत आहे.
पावसाळ्याला सुरुवात होत आहे. कचरा असाच साचून राहिल्यास आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. पोलिसांनी काँग्रेस पक्षाचे गटनेते चंद्रशेखर चौधरी, दर्शना इंगोले, पल्लवी रामटेके, विशाल पावडे, बबली या नगरसेवकांना अटक करण्यात आली. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.