नखांसाठी गरोदर वाघिणीला जिवंत जाळलं; पोटात होते चार शावक

सोमवार, 26 एप्रिल 2021 (20:09 IST)
यवतमाळमधील धक्कादायक घटनेत पांढरकवडा तालुक्यात गर्भवती वाघिणीची शिकार झाल्याचे उघडकीस आले आहे. या वाघिणीच्या नखांसाठी तिचा शिकार केल्याचे समोर येत आहे कारण वाघिणीच्या समोरील पायाचे पंजे शिकाऱ्यांनी कापून नेले. 
 
सोमवारी सकाळी मुकु टबन परिक्षेत्रातील मांगुर्ला नियतक्षेत्रातील राखीव वनकक्ष क्र. ३० मध्ये सकाळी गस्तीदरम्यान वनरक्षकाला वाघिणीचा मृतदेह आढळून आला. 
 
वनरक्षकाने ही माहिती वरिष्ठांना दिली. येथे नाल्याला लागून एक गुहेत बाघिणीला अडकवून आग लावण्यात आली. गुहेचे प्रवेशद्वार अतिशय छोटा असल्यामुळे वाघिणीला गुहेत अडकवून ठेवण्यासाठी बांबू आणि इतर साहित्या वापरण्यात आलं. आगीनं वाघिणीचा मृत्यू झाला वा नाही याची खात्री करण्यासाठी तीक्षण् हत्यारांनी तिच्या शरीरावर जखमा केल्या गेल्याचा खुणा देखील आहेत. त्यानंतर दोन्ही पंजे कापून नेले.
 
अलीकडे महिनाभरापूर्वी झरी तालुक्यात देखील वाघाचा संशयास्पद मृत्यू झाला अशात यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक शिकाऱ्यांच्या टोळया सक्रिय झाल्याची चर्चा आहे. गर्भवती वाघिणीच्या पोटात चार शावक होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती