शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी ९० लाखांचे फिक्स डिपॉझिट रेमडेसिविर खरेदीचा मार्ग केला मोकळा

सोमवार, 26 एप्रिल 2021 (15:17 IST)
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विदारक स्थिती असून यामध्ये हिंगोलीचाही समावेश आहे. मागील आठवड्यात करोना रुग्णांसाठी उपचारांमध्ये महत्त्वाचे असणारे रेमडेसिविर इंजेक्शन जिल्ह्यात कुठेही उपलब्ध नव्हते. जिल्ह्यातील कोणताही औषध वितरक एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्कम गुंतवण्यास असमर्थ होता. यावेळी हिंगोलीच्या कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी करोना रूग्णांसाठी स्वतःच्या बचतीचे बँकेतील तब्बल ९० लाखांचे फिक्स डिपॉझिट मोडून हिंगोलीतील एका औषध वितरकाला मदत केली आणि रेमडेसिविर इंजेक्शन हिंगोली जिल्ह्यासाठी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला.
 
संतोष बांगर यांच्या मदतीमुळे तब्बल दहा हजार इंजेक्शन्स जिल्ह्यातील करोना रुग्णांसाठी टप्प्याटप्प्याने उपलब्ध होत आहेत. “ज्या लोकांनी आपल्याला निवडून दिले त्या लोकांसाठी काम नाही करायचे तर मग अर्थ काय? आम्ही शिवसैनिक आहोत, शिवसेना ही कायम सामान्यांना संकटात मदत करायला अग्रभागी असते,” अशी प्रतिक्रिया संतोष बांगर यांनी दिली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती