आता बोला, खुद्द महापालिका आयुक्तांच्याच नावाने पैसे लाटण्याचा उद्योग सुरू

बुधवार, 3 ऑगस्ट 2022 (21:46 IST)
नाशिक खुद्द महापालिका आयुक्तांच्याच नावाने पैसे लाटण्याचा उद्योग सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी पालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी पोलीस आयुक्तांकडे धाव घेत तक्रार केली आहे.
 
महापालिका आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांचा फोटो व्हॉट्सॲप डीपीमध्ये वापरत स्वतःला आयुक्त असल्याचे भासवत एका भामट्याने हा उद्योग सुरू केला आहे. या भामट्याकडून व्हॉट्सअॅप मेसेजमधून दिलेल्या लिंकवर क्लिक करत पैसे पाठवण्याची सूचना केली जात आहे. सदर प्रकार आयुक्तांच्या लक्षात निदर्शनास येताच त्यांनी याबाबत पोलिसांत धाव घेत तक्रार केली. या प्रकरणाचा सखोल तपास नाशिक पोलीस करत आहेत. आपल्या नावाने पाठवल्या जाणाऱ्या खोट्या मेसेजेसला बळी न पडण्याचे आवाहन महापालिका आयुक्तांनी केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती