अहो पुण्याच्या बाजारात आले तब्बल १ किलो ४०० ग्रॅमचे एक हनुमानफळ

मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (10:10 IST)
फळांची आवक सुरु झाली असून विविध फळे बाजारात येत आहेत. त्यात आता नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन परिसरातून पुणे गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये रविवारी हनुमानफळांची आवक झाली असून त्यात आता तब्बल १ किलो ४०० ग्रॅमचे एक हनुमानफळ दाखल झाले आहे. त्या फळाला खास पाहण्यासाठी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी एकाच गर्दी केली.
 
मागील पंधरा दिवसांपासून मार्केट यार्डातील हनुमानफळाची आवक झाली आहे. आगोदर आवक तुलनेने कमी झाली, मात्र आता पाऊस पूर्ण बंद झाला आणि ही आवक वाढू लागली आहे. रविवारी ५० क्रेट इतकी हनुमानफळाची आवक झाली़ होती, एका क्रेटमध्ये १५ ते १६ किलो इतकी हनुमानफळे असतात़ उच्च दर्जाच्या फळास ८० ते १०० रुपये, मध्यम दर्जाच्या फळास ५० ते ७० रुपये आणि दुय्यम दर्जाच्या मालास ४० रुपये प्रतिकिलोस दर मिळाला़ आहे.  हनुमान फळात सीताफळापेक्षा खूप कमी बिया असतात. एका हनुमान फळाचे वजन १०० ग्रॅमपासून दीड किलोपर्यंत असते. एका झाडाला सुमारे ४० किलो वजनाची फळे लागतात. फळाचा हंगाम नोव्हेंबर ते जानेवारी असा असतो असेही तेथील व्यापारी म्हणाले आहेत. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती