'त्या' आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना फोन केला

सोमवार, 11 नोव्हेंबर 2019 (16:28 IST)
भाजपमध्ये गेलेल्या आमदारांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांना फोन केल्याची माहिती मिळत आहे. गरज पडली तर आम्ही राजीनामा द्यायला तयार आहोत, असं या आमदारांनी अजित पवारांना सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली. पुणे आणि साताऱ्यातील हे आमदार अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. 
 
लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक नेते, विद्यमान आमदार भाजपमध्ये गेले होते. याशिवाय अनेकांनी शिवसेनेतही प्रवेश केला होता. मात्र सध्याच्या राजकीय परिस्थितीत हे आमदार पुन्हा राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या 4 जणांचा विजय झाला आहे. तर शिवसेनेत गेलेल्या एकाच आमदाराचा विजय झाला.
 
राष्ट्रवादीतून आलेले भाजपचे तिकीटधारक
 
बबनराव पाचपुते – राष्ट्रवादी ते भाजप – श्रीगोंदा, अहमदनगर – विजयी
राणा जगजितसिंह पाटील – राष्ट्रवादी ते भाजप – तुळजापूर, उस्मानाबाद – विजयी
नमिता मुंदडा – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते भाजप – केज, बीड विजयी
शिवेंद्रराजे – सातारा – विजयी
राष्ट्रवादीतून आलेले शिवसेनेचे तिकीटधारक (Incoming Outgoing for Candidature)
 
भास्कर जाधव – राष्ट्रवादी ते शिवसेना – गुहागर, रत्नागिरी – विजयी
पांडुरंग बरोरा – राष्ट्रवादी ते शिवसेना – शहापूर, ठाणे – पराभूत
दिलीप सोपल – राष्ट्रवादी ते शिवसेना – बार्शी, सोलापूर – पराभूत
जयदत्त क्षीरसागर – राष्ट्रवादी ते शिवसेना – बीड, बीड – पराभूत
रश्मी बागल – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते शिवसेना – करमाळा, सोलापूर – पराभूत
शेखर गोरे – (आमदार नाही) – राष्ट्रवादी ते शिवसेना – माण, सातारा – पराभूत

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती