न्यायालयात झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाची एक मागणी फेटाळून लावण्यात आली

बुधवार, 14 डिसेंबर 2022 (14:30 IST)
शिवसेना पक्षनाव आणि पक्ष चिन्ह याबाबत काहीच मिनिटांत सुनावणी संपली. तसेच काहीसे शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीतही घडल्याचे पाहायला मिळाले. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाची एक मागणी फेटाळून लावण्यात आली. सर्वोच्च न्यायालयातील ही सुनावणी काहीच मिनिटे चालली. त्यानंतर ही सुनावणी आता पुढील वर्षीपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. 
 
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात प्रत्येक सुनावणीवेळी महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर ही सुनावणी झाली. अगदी काही मिनिटंच घटनापीठासमोर युक्तिवाद झाला. यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांनी सदर खटला सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर चालवावा, अशी मागणी केली. मात्र न्यायालयाने ही मागणी तूर्तास फेटाळून लावली आहे. शिवसेनेचे बंडखोर एकनाथ शिंदे आणि इतर आमदारांवरील अपात्रतेची कारवाई, यासोबतच राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांच्या अधिकार कक्षांचा उहापोह करणाऱ्या या महत्त्वाच्या खटल्याची पुढील सुनावणी आता पुढील वर्षी १० जानेवारी रोजी होईल, असे निर्देश न्यायालयाने यावेळी दिले. 
 
सविस्तर आणि रितसर मागणी करण्याच्या सूचना
 
शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी सदर खटला सात न्यायाधीशांसमोर चालवण्याची मागणी केली. मात्र ही मागणी फेटाळण्यात आली. यासंदर्भात सविस्तर आणि रितसर मागणी करण्याच्या सूचना न्यायालयाने दिल्या आहेत. कपिल सिब्बल आता लेखी स्वरुपात ही मागणी सादर करतील, असे म्हटले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती