माझ्या डेथ सर्टिफिकेटवरही औरंगाबाद नाव हवं- इम्तियाज जलील

गुरूवार, 7 जुलै 2022 (10:23 IST)
'औरंगाबादच्या नामांतराच्या वेळी आपण शांत राहिलो तर येण्याऱ्या पुढ्या आपल्याला नक्कीच विचारेल की, जेव्हा या शहराचं नामांतर होत होतं, तेव्हा तुम्ही काय करत होता. त्यामुळे नामांतराला विरोध व्हायलाच हवा,' असं एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे.
 
'माझा जन्म औरंगाबादमध्ये झाला असून मला मृत्यू देखील औरंगाबादमध्येच यायला हवा. माझ्या बर्थ सर्टिफिकेटवर औरंगाबाद आहे. तर डेथ सर्टिफिकेटवरही औरंगाबादच असायला हवं,' असं जलील म्हणाले.
 
औरंगाबाद येथे इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराला विरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलविली होती. नामांतराचा मुद्दा हा हिंदू-मुस्लीम मुद्दा आहे. आम्ही सर्वजण छत्रपती संभाजी महाराजांचा आदर करतो. मात्र सत्तेत बसलेल्या पक्षाच्या एका नेत्यांने 25 ते 30 वर्षांपूर्वी औरंगाबादमध्ये येऊन नामांतराची इच्छा व्यक्त केली होती. केवळ त्या नेत्याच्या इच्छेखातर आपण नामांतराचा अन्याय सहन का करायचा, असा सवाल जलील यांनी बैठकीत उपस्थित केला. सकाळनेही बातमी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती