मुंबई महापालिकेत आम्ही ऑडिट लावू, चौकशी करू असे मध्यंतरी चालले होते. तेव्हा मीच मागणी केली प्रत्येक पैशाचे ऑडिट करा आम्ही तयार आहोत. पण तसेच ऑडिट आता नागपूर, ठाण्यात, कल्याण-डोंबिवलीसह पुणे महापालिकेतही केले पाहिजे. प्रत्येक रूपयाचा खर्च लोकांना दिसलाच पाहिजे असे आव्हान माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारला दिले.
कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीतील महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ, गुरुवारी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची रॅली व सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ठाकरे बोलत होते. विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार श्रीनिवास पाटील, आदित्य शिरोडकर, काँग्रेसचे सुनील केदार यांच्यासह तीनही पक्षाचे शहर पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे शहरात भाजपची महापालिकेत सत्ता असताना नागरिकांना मिळकतकरात देण्यात येणारी ४० टक्के सवलत रद्द करून कर लावण्यास सांगितला. तर दुसऱ्या बाजुला महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यात मुंबईत ५०० स्वे. फूटापर्यंतच्या घरांना कर रद्द केला. एकदेखील नवीन कर न लावता ९० हजार कोटी रूपये मुंबई महापालिकेकडे सरप्लस आहेत. महापालिका ही शहरवासीयांच्या हितासाठी असते हेच हे भाजप सरकार विसरले असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.