HSC EXAM: बारावीच्या परीक्षेत कॉप्या पुरवण्याचा धक्कादायक प्रकार !

बुधवार, 21 फेब्रुवारी 2024 (14:46 IST)
आजपासून इयत्ता बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. परीक्षेमध्ये कोणताही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये या साठी जिल्हा प्रशासन व शिक्षण विभागाने विविध उपाययोजना केले असून त्याची अंमलबजावणी करत आहे. 
तरीही बीडच्या तेलंगावच्या एका शाळेच्या इमारतीवर चढून कॉप्या पुरवण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल  झाला आहे. 
 
शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून विद्यार्थी कॉपी करू नये या साठी वेगवेगळे पथक तयार करण्यात आले आहे. तरीही बीड मध्ये  तेलंगावच्या एका शाळेत काहीही जण महाविद्यालयाच्या इमारतीवर चढून परीक्षार्थींना कॉपी पुरवत असल्याचे समोर आले आहे. 

राज्यात आजपासून इयत्ता 12वी चा इंग्रजी विषयाचा पेपर असून विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये या साठी कडेकोट पोलीस बंदोबस्त केला गेला आहे. तरीही महाविद्यालयाच्या मागील बाजूने जीव धोक्यात घालत इमारतीवर चढून कॉप्या पुरवत होते. याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

Edited by - Priya Dixit 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती