राज्य शिक्षण मंडळाने दहावी, बारावी प्रात्यक्षिक परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले असून 12वीची प्रात्यक्षिक परीक्षा 2 ते 20 फेब्रुवारीदरम्यान होणार आहे तर 10वीची प्रात्यक्षिक व तोंडी परीक्षा 10 ते 19 फेब्रुवारी या कालावधीत होईल. प्रात्यक्षिक परीक्षेसाठीचे गुण शिक्षक, प्राचार्यांना www.mahahssboard.in या संकेतस्थळावरील प्रॅक्टिकल मार्क अँड ग्रेड लिंकमधून प्रचलित लॉगीन आयडी व पासवर्डचा वापर करून नोंदवावे लागणार आहेत.
प्रात्यक्षिक व तोंडी श्रेणीअंतर्गत मूल्यमापन परीक्षा नियमित कालावधीत देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी लेखी परीक्षेनंतर आऊट ऑफ टर्न परीक्षा घेतली जाईल. अशा विद्यार्थ्यांचे बैठक क्रमांक आऊट ऑफ टर्न परीक्षेसाठी ज्या-त्या कनिष्ठ महाविद्यालय, शाळांना उपलब्ध करून दिले जाणार आहेत.