बारावीची परीक्षा रद्द करण्याची अधिकृत घोषणा बोर्डाकरून देण्यात आली असून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या बाबत सविस्तर परिपत्रक जारी केले गेले आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थीना कोरोनाची लागण लागू नये या साठीं ही परीक्षा रद्द करण्याचे स्पष्टीकरण या परिपत्रकेत देण्यात आले आहे.
इयत्ता 12 वी च्या परीक्षेते बसणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण केले जावे . इयत्ता बारावीची परीक्षा रद्द केल्यामुळे, अंतर्गत मूल्यमापनाच्या कार्यपद्धतीबाबत तसेच गुणपत्रक /प्रमाणपत्र देण्याबाबत स्वतंत्रपणे निर्देश निर्गमित केले जातील.