नाल्यात सख्खे बहीण-भाऊ वाहून गेले

सोमवार, 14 जून 2021 (16:08 IST)
नागपुरातील हिंगणा पोलिस ठाण्यातंर्गत येणाऱ्या सावंगी देवळी येथील नाल्यात सख्खे बहीण-भाऊ वाहून गेले. आरूषी नामदेव राऊत (वय ११) व अभिषेक नामदेव राऊत (वय ८) अशी या भावंडांची नावे आहेत. आरुषी व अभिषेक हे  बहीण-भाऊ रविवारी दुपारपासून बेपत्ता झाल्‍याची तक्रार मुलांच्या आईने हिंगणा पोलिस ठाण्यात दिली होती. 
 
हिंगणा पोलिसांनी रात्रभर शोध घेतल्यानंतरही मुले आढळून आली नाहीत. आज सकाळी पोलिस सावंगी देवळी येथे पोहोचले. तिथे दोघांचेही मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले.  कोंबडी पकडता पकडता दोघेही नाल्यापर्यत गेले. तिथे मासोळ्या दिसताच मासोळ्या पकडायला लागले. त्यातच दोघेही पाण्यात बुडाल्याची शक्यता व्यक्‍त करण्यात येत आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती