काय म्हणता, निवडणुकीत विजयी आलेल्या पतीला धाकड पत्नीने खांद्यावर उचलून काढली मिरवणूक

मंगळवार, 19 जानेवारी 2021 (16:12 IST)
निवडणुकीमध्ये एखादा नेता निवडून आला तर कार्यकर्ते त्यांना खांद्यावर उचलून जल्लोष करतात. महिला निवडून आली तर तिचे पती, भाऊ तिला दोन्ही दोन्ही हाताने उचलून घेतात. मात्र पती निवडून आला म्हणून धाकड पत्नीने खांद्यावर उचलून मिरवणूक काढावी, अशी घटना पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातल्या पाळू गावात घडली.
 
पाळू ग्रामपंचायतीमध्ये संतोष शंकर गुरव  यांनी 221 मते मिळवत विरोधी उमेदवारावर 44 मतांनी विजय मिळविला. त्यामुळे त्यांच्या पत्नी रेणुका गुरव यांनी आनंदोत्सव साजरा करताना पतीराजांना थेट खांद्यावर उचलून घेत मिरवणूक काढली.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती