अमरावतीमध्ये हिट अँड रन प्रकरण, दुचाकीस्वाराला कारची धडक,मृत्यू

Webdunia
रविवार, 26 मे 2024 (17:19 IST)
पुण्यानंतर अमरावतीमध्ये हिट अँड रनची घटना समोर आली आहे. दुचाकीला धडक दिल्यावर कार मधील लोकांनी दुचाकीस्वाराला रुग्णालयात नेण्याऐवजी तिथून पळ काढला. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. कार कोणाची होती.आणि कोण स्वार होते हे अद्याप कळू शकले नाही. भीमसेन वाहने असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. 

पोलिसांनी आता या प्रकरणी कार आणि कार स्वारांची माहिती देणाऱ्यास 20 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. डीसीपी सागर पाटील यांनी सांगितले की, आम्ही कारस्वारला लवकरच पकडण्याचा प्रयत्न करत आहो. या साठी तीन पथके नेमण्यात आली आहे.  
 
अमरावतीमध्ये 3 मे रोजी दुपारी 12:16 मिनिटपर 64 वर्षीय भीमसेन दुचाकीने जात असताना समता कॉलोनीत गल्ली नंबर 3 जवळ एका वेगवान कार ने त्यांना मागून धडक दिली. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 
या व्हिडीओ मध्ये कारमधून तीन लोक उतरले असून ते भीमसेन वाहने रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहून तातडीनं पुन्हा कार मध्ये बसून तिथून पळ काढतात. भीमसेन यांना नागरिकांनी तातडीनं रुग्णालयात नेले.

भीमसेन यांचा रुग्णालयात उपचाराधीन असता मृत्यू झाला. 23 दिवसानंतर देखील अद्याप पोलिसांना शोध लागू शकला नाही. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य घेत आरोपींचा शोध लावला अशी मागणी भीमसेन वाहने यांच्या कुटुंबाकडून केली जात आहे. 

Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

पुढील लेख