Rain Update: कोकणासह, मध्य महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता

शुक्रवार, 24 सप्टेंबर 2021 (17:24 IST)
हवामान खात्याने सांगितले की राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून पुढील काही दिवस हा पाऊस सुरूच राहणार आहे. हवामान विभागाने येत्या पाच दिवसात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे पुढील 12 तासात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार ते पाच दिवस राज्यात 48 तासांत गडगडाटी वादळासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे 24 ते 27 पर्यंत राज्यातील बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
 
मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाट भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज आहे. 25 सप्टेंबरपासून मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढेल. पुणे, पालघर, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीसह वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती