राज्यात 3,320 नवे कोरोना रुग्ण,4,050 जणांना डिस्चार्ज
राज्यात गुरुवारी 3 हजार 320 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली तर,4 हजार 050 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.राज्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या कमी झाली असून, सध्या 39 हजार 191 ॲक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यात 61 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.आजपर्यंत 1 लाख 38 हजार 725 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 2.12 टक्के एवढा आहे.राज्यात आजपर्यंत 5 कोटी 76 लाख 46 हजार 515 प्रयोगशाळा नमुने तपासण्यात आले आहेत.सध्या राज्यात 2 लाख 61 हजार 842 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत, तर 1 हजार 461 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.