मका, सोयाबीन, कापूस, तुर, बाजरी, ज्वारी, कांदा, पपई, मिरची, सेायाबीन या पिकांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यातील १३५ गावातील ४८ हजार ५९४ शेतकऱ्यांना त्याची झळ बसली त्र्यंबकमधील शेतकऱ्यांचा आकडा मोठा आहे.
सरकारी यंत्रणेऩे युध्द पातळीवर पंचनामे सुरु केले आहेत. त्यात पुन्हा पाऊस सुरु झाल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. त्र्यंबकला झालेल्या पावसाने परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर पिकांचे आणखी नुकसान होईल, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.