मध्य महाराष्ट्र, कोकणात जोरदार पाऊस

गुरूवार, 30 सप्टेंबर 2021 (22:26 IST)
हवामान विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, 30 सप्टेंबर पासून 3 ऑक्टोबरपर्यंत देशातील अनेक राज्यात सामान्य आणि मध्यमसह जोरदार पाऊस  होण्याची शक्यता आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तमिळनाडु, गुजरात आणि बिहारमध्ये चार दिवसापर्यंत पावसाची शक्यता आहे.
 
भारतीय हवामान शास्त्र विभागानुसार (आयएमडी) बंगालच्या खाडीत तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे दक्षिणी पश्चिम बंगालमध्ये जोरदार पाऊस होऊ शकतो.
 
हवामान विभागानुसार, मध्य महाराष्ट्र, कोकणात जोरदार पाऊस होऊ शकतो. पुढील दोन दिवसात गुजरात, उत्तर कोकण, उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. स्कायमेटनुसार, महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, किनारी कर्नाटकचा काही भाग, केरळ, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार द्वीप समूह, किनारी ओडिसा आणि पश्चिम बंगालमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस होऊ शकतो. तर बिहार, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश, झारखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगढ, मध्य प्रदेश, राजस्थान आणि पूर्वोत्तर भारतात काही ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती