'या' गाड्यांना कोकण रेल्वेने दिली मुदतवाढ

शनिवार, 25 सप्टेंबर 2021 (16:25 IST)
कोरोना काळात कोकण रेल्वे मार्गावर  विशेष गाड्या सुरु करण्यात आल्या आहेत. तसेच गणेशोत्सव काळात कोकणात जाण्यासाठी काही रेल्वे सुरु केल्यात. आता या गाड्यांना कोकण रेल्वेने मुदतवाढ दिली आहे.  त्यामुळे या गाड्या आपल्या नियमित वेळापत्रकानुसार धावणार आहेत. दरम्यान, प्रवास करणाऱ्यांना कोविडच्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. दोन डोस झालेल्यांना प्रवास करता येणार आहे. तसेच आरक्षण असेल त्यालाच प्रवास करता येणार आहे.
 
कोकण रेल्वे मार्गावर गणपती उत्सवानिमित्ताने  दिवा ते रत्नागिरी, दिवा ते सावंतवाडी  गाड्या सुरू केल्या होत्या. या गाड्या 30 सप्टेंबरपर्यंत धावणार होत्या. आता या 31 ऑक्टोबरपर्यंत चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वेने घेतला आहे.  
 
दिवा ते रत्नागिरी, सावंतवाडी गाड्या सप्टेंबरऐवजी ऑक्टोबरपर्यंत धावणार असताना आता कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मांडवी, कोकणकन्या फेस्टिव्हल स्पेशल गाड्यांना 31 जानेवारी 20211 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
दरम्यान, जबलपूर एस्प्रेसला तीन डबे कायमस्वरुपी वाढविण्यात आले आहेत. कोकण रेल्वे मार्गावर रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवलीसह कुडाळला थांबे देण्यात आले आहेत. जबलपूर  -  कोईमतूर एकस्प्रेसला तीन डबे कायमस्वरुपी  वाढवण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.  रेल्वे क्रमांक 02198/02197 ही साप्ताहिक सुपरफास्ट फेस्टिव्हल  स्पेशल गाडीला 1 वातानुकूलित तर दोन स्लीपरचे असे एकूण तीन कोच कायमस्वरुपी वाढवण्यात आले आहेत. हा बदल 24 सप्टेंबरपासून लागू झाला आहे.
 
पुणे-एर्नाकुलम आठवड्यातून दोनदा
 कोकण रेल्वे मार्गे धावणारी पुणे-एर्नाकुलम (01197/01198) एक्स्प्रेसची फेरी वाढविण्यात आली आहे. आता ही गाडी आठवड्यातून दोन वेळा धावणार आहे. मडगाव, लोंढा, मिरज मार्गे धावणारी पुणे -एर्नाकुलम एक्स्प्रेस आज 25 सप्टेंबरपासून पुन्हा धावणार आहे. तर कोकण मार्गे धावणाऱ्या पुणे-एर्नाकुलम एक्स्प्रेसला(01150/01150) पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली सावंतवाडी असे थांबे देण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती