मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणावर जानेवारीत सुनावणी

शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाला दिलेलं आरक्षण वैध ठरवण्याच्या मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाविरोधातील याचिकांवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने पुढे ढकलली आहे. या याचिकांवर आता पुढल्या वर्षी म्हणजे जानेवारी 2020 मध्ये सुनावणी  होणार आहे.
 
फडणवीस सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये 16 टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली होती. मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देणारा कायदा राज्य सरकारने 30 नोव्हेंबर 2018 रोजी केला होता. सरकारच्या या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिकांद्वारे आव्हान देण्यात आलं होतं. परंतु हायकोर्टानेही सरकारचा निर्णय कायम ठेवला आणि आरक्षण वैध ठरवलं होते.त्यानंतर, मुंबई हायकोर्टाच्या या निर्णयाला थेट सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलं. मराठा समाजाला आरक्षण देताना सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने आरक्षणाबाबत लागू केलेल्या 50 टक्के मर्यादेचे उल्लंघन होत असल्याचा आक्षेप याचिकेत नोंदवण्यात आला आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती