माजी अर्थमंत्री सुधीर मुंनगंटीवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये अर्धा तास बैठक झाली. बंद दाराआड सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये ही बैठक झाली. या अचानक भेटीनं राजकीय चर्चा सुरु झाली आहे. पण जिल्ह्यातील विकास कामांसाठी भेटल्याचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. या बैठकीत फक्त माझ्या मतदार संघतील विकास कामांसंदर्भात चर्चा झाली. तसेच चंद्रपूर विमानतळासह इतर विषयांसंदर्भात देखील चर्चा झाल्याची मुनगंटीवार यांनी माहीती दिली आहे.