राजधानी दिल्लीत इस्राईलच्या दुतावासावर झालेल्या हल्ल्यानंतर मुंबईतही हाय अलर्ट जारी करण्यात आलाय. त्यामुळेच मुंबईचे पोलीस आयुक्त (कायदा सुव्यवस्था) विश्वास नांगरे पाटील स्वतः मैदानात उतरलेत. मुंबईतील इस्राईलच्या दुतावासाला भेट देत येथील सुरक्षेचा आढावा घेतला. मुंबईत लोवर परेल, करी रोड भागातील मॅरेथॉन फ्युचरेक्स या बहुमजली इमारतीत हे दुतावास आहे. याच पार्श्वभूमीवर विश्वास नांगरे पाटील यांनी या इमारतीसह परिसराची स्वतः पाहणी केली.