राज्याची सीमेवर महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर मोठ्या प्रमाणात गुटख्याची ने-आण होते, याची खबर पोलिसांना मिळाली होती, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय जाधव यांनी सीमेवरुन येणाऱ्या गुटख्यावर नजर ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. मरखेल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत गुंगेवाड यांनीत्यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मरखेल-तुंबरपल्ली रस्त्यावर सापळा रचला होता. तेव्हा पोलिसांनी कंटेनर क्र.युपी-१४-एफटी-७१९८ ची तपासणी केली होती, त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असणारा १२० बाबा नावाचा सुगंधी तंबाखू होता. पोलिसांनी कागदपत्रांचीही पाहणी केली.
महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची ने-आण करणारा हा कंटेनर मरखेल पोलिसांनी जप्त केला. कंटेनर व सुगंधीत तंबाखूसह याची किंमत १ कोटी २० लक्ष ४४ हजार ५४१ एवढी होते. हा कंटेनर मुद्देमालासह जप्त करण्यात आला असून, कंटेनर चालक महेश बिशक्रर्मा रा.रोनग्राम जि.भेट यास ताब्यात घेण्यात आले आहे.