उंब्रज : यशवंतनगर ता. कराड गावच्या हद्दीत रात्रीच्या वेळी होणारी गुटखा वाहतूक रोखण्यात तळबीड पोलिसांना यश आले असून तब्बल ८३ लाखांच्या गुटख्यासह सव्वा कोटीचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी कंटेनर चालकासह दोघांना अटक केली आहे. कराड ते मसुर रस्तावर मंगळवारी २१ रोजी पहाटे ही कारवाई करण्यात आली. बेकायदेशीर रित्या वाहतूक करणाऱ्या गुटख्याचा कंटेनर तळबीड पोलिसांनी ताब्यात घेतला असून एक कोटी तेरा लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कंटेनर मध्ये 83 लाखांचा गुटखा मिळून आला आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान परराज्यातून महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर गुटखा येतो. महामार्ग व चोरट्या मार्गाने होणाऱ्या गुटखा वाहतूकीवर आजवर अनेक कारवाई झाल्या आहेत. मात्र पहिल्याच मोठी कारवाई करण्यात तळबीड पोलिसांना यश आले असून गुटखा बंदीनंतर आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई तळबीड पोलिसांकडून झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशानुसार २१ फेब्रुवारी दरम्यान रात्री अकरा ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान तळबीड पोलिसांकडून नाकाबंदी नेमण्यात आली होती. त्यादरम्यान मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात गुटखा विक्री करण्यासाठी बंदी असताना कर्नाटक राज्यातून कर्नाटक राज्यातून एक कंटेनर गुटखा वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली.