नाशिकात गौमांस वरून मारहाण करणाऱ्यांना जीआरपी अटक करणार, न्यायालयाने जामीन रद्द केला

मंगळवार, 3 सप्टेंबर 2024 (15:54 IST)
नाशिक येथे एका एक्स्प्रेस ट्रेन मध्ये गोमांस घेऊन जात असल्याच्या संशयावरून एका वृद्ध व्यक्तीशी मारहाण केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांचा जामीन न्यायालयाने मंजूर केल्यावर त्यांना जामीन मिळाला. नंतर रेल्वे पोलीस(जीआरपी)ने या प्रकरणात पुन्हा त्यांना अटक करण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. पोलिसांनी आरोपींवर दरोडा, आणि धार्मिक भावना दुखवल्याचा आरोप केला असून या वरून न्यायालयाने त्यांचा जामीन रद्द केला आहे.

या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पोलिसांनी 31 ऑगस्ट रोजी धुळे येथून तिघांना अटक केली आणि दुसऱ्या दिवशी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांचा जामीन मंजूर केला. तसेच जामीन मंजूर झाल्यावर त्यांना जीआरपी अटक करू शकणार नाही असे सांगितले. त्यांना घरी सोडण्यात आले. 

पोलिसांनी त्यांचा जमीन रद्द करण्यासाठी पीडितेने दिलेल्या अतिरिक्त माहितीच्या आधारे दरोडा आणि धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला नंतर न्यायालयाने आरोपींचे जामीन रद्द केले. आरोपी पसार असून पोलीस ताब्यात घेण्यासाठी त्यांचा शोध घेत आहे. 
Edited by - Priya Dixit  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती