मिळालेल्या माहितनुसार या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. लोको पायलट आणि गार्ड सुरक्षित आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, माहिती मिळताच पथक घटनास्थळी पाठवण्यात आले. ही घटना स्थानकापासून थोड्या अंतरावर घडल्याने, अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि मदत आणि दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले. मालगाडीचे काही डबे रुळाखाली आल्यामुळे आजूबाजूच्या रुळांचेही नुकसान झाले, त्यामुळे सुरत-भुसावळ रेल्वे मार्ग बंद करण्यात आला. ही घटना कशी घडली याची चौकशी केली जाईल. अशी माहिती समोर आले आहे.