मिळालेल्या माहितीनुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर अखेर दोन्ही देशांनी युद्धबंदीची घोषणा केली. आता, या पार्श्वभूमीवर आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. माध्यमांशी बोलताना मंत्री रामदास आठवले म्हणाले की, पाकिस्तान हा दहशतवाद्यांना प्रोत्साहन देणारा देश आहे. आम्ही डोनाल्ड ट्रम्पचा आदर करतो, पण मी अनेकदा म्हटले आहे की पाकव्याप्त काश्मीर भारताचाच असला पाहिजे. आपण त्यासाठी लढले पाहिजे आणि वेळ आली तर आपण पाकिस्तानही काबीज केला पाहिजे. आम्ही डोनाल्ड ट्रम्प किंवा इतर कोणीही मध्यस्थी करू इच्छित नाही. जर दहशतवादी कारवाया थांबल्या आणि पाकव्याप्त काश्मीर आमच्याकडे सोपवला गेला तर भारत पाकिस्तानशी थेट चर्चा करण्यास तयार आहे, असे मंत्री आठवले म्हणाले. युद्धाची गरज नाही. आमची भूमिका अशी आहे की आम्हाला पाकव्याप्त काश्मीर मिळाला पाहिजे. पाकिस्तानने युद्धबंदीची विनंती केली होती. पाकिस्तानने आपला पराभव मान्य केला आहे. असे देखील ते यावेळी म्हणाले.