दुर्वा सायबू शिंदे या एक वर्षाच्या बालिकेचे नाव आहे. सायबू मारुती शिंदे हे शिवाजीनगरमध्ये आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांची सर्वात धाकटी मुलगी दुर्वा घराजवळच खेळत होती. त्यावेळी ती पाण्याने भरलेल्या टबमध्ये पडली. शेजाऱ्यांनी दुर्वाला पाहिल्यानंतर ही घटना उघडकीस आली. दुर्वाला तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.