आरोपीने सांगितले की तो तक्रारदाराला 1 एप्रिल 2024 पासून 60 महिन्यांसाठी वडाळा गावातील तैयबानगर येथील मदार अपार्टमेंटच्या बी विंगमधील फ्लॅट क्रमांक14 आणि 15 ब मोठ्या ठेवीवर देईल. या बहाण्याने आरोपीने तक्रारदाराकडून 10 लाख रुपये घेतले. परंतु पैसे घेऊनही आरोपी अन्सारीने तक्रारदार पिंजारी यांना सदर फ्लॅटचा ताबा दिला नाही आणि त्यांची 10 लाख रुपयांची फसवणूक केली.